Aarti Badade
अनेकांना नवीन उत्पादने वापरण्याची हौस असते. पण सतत स्किन रूटीन बदलल्याने त्वचेचा नैसर्गिक संरक्षक थर (Skin Barrier) खराब होऊ शकतो.
Skincare Mistakes to Avoid
Sakal
त्वचेचा नैसर्गिक थर कमजोर झाल्यामुळे त्वचा अतिशय संवेदनशील बनते. यामुळे जळजळ, लालसरपणा आणि खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
Skincare Mistakes to Avoid
Sakal
नवीन उत्पादनांमधील घटकांशी त्वचेचे जुळवून घेणे कठीण होते. वारंवार बदल केल्याने छिद्रे बंद होऊन किंवा रिॲक्शन म्हणून मुरुमे (Acne) येऊ शकतात.
Skincare Mistakes to Avoid
Sakal
सततच्या बदलांमुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते. परिणामी त्वचा कोरडी आणि निस्तेज पडते, ज्यामुळे एक्झिमा किंवा डर्माटायटीसचा धोका वाढतो.
Skincare Mistakes to Avoid
Sakal
कोणतेही नवीन उत्पादन वापरल्यानंतर त्याचे रिझल्ट दिसण्यासाठी त्वचेला किमान ३ ते ६ आठवड्यांचा वेळ द्यावा लागतो. घाईत उत्पादन बदलणे चुकीचे आहे.
Skincare Mistakes to Avoid
Sakal
एकावेळी एकच नवीन उत्पादन वापरा. क्लीन्सर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन यांसारख्या मूलभूत गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करा. ऋतूनुसार हळूवारपणे बदल करा.
Skincare Mistakes to Avoid
Sakal
जर तुमच्या त्वचेवर सतत समस्या येत असतील किंवा जळजळ थांबत नसेल, तर स्वतः प्रयोग करण्याऐवजी त्वरित त्वचारोगतज्ज्ञांचा (Dermatologist) सल्ला घ्या.
Skincare Mistakes to Avoid
Sakal
serum and moisturizer benefits in winter
Sakal