केसांना टक्कल पडण्यापासून वाचवायचंय? झोपताना 'या' चुका टाळा!

Aarti Badade

रात्री केस मोकळे ठेवायचे की बांधून?

दिवसभर केसांची काळजी घेतो, पण रात्री झोपताना काय करावं, हे तुम्हाला माहीत आहे का? एका चुकीमुळे हेअरफॉल वाढतो!

Esakal

केस बांधण्याचे फायदे

रात्री केस बांधल्याने ते गुंताळत नाहीत आणि सकाळी मोकळे आणि मऊ राहतात. यामुळे केसांचे तुटणेही कमी होते.

Esakal

केस बांधण्याचे तोटे

खूप घट्ट केस बांधल्यास केसांवर ताण येतो, ज्यामुळे केस गळू शकतात. तसेच, घट्ट बांधणीमुळे केसांना नैसर्गिक तेल मिळत नाही आणि ते कोरडे होतात.

Esakal

केस मोकळे सोडल्यास...

केस मोकळे सोडल्याने केसांवर ताण येत नाही, पण त्यामुळे ते जास्त गुंततात आणि तुटण्याची शक्यता वाढते.

Esakal

सर्वोत्तम पर्याय कोणता?

तुमच्या केसांच्या प्रकारानुसार निर्णय घ्या. जर केस खूप गुंतत असतील, तर सैल वेणी किंवा हलका अंबाडा बांधणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Esakal

केसांच्या आरोग्यासाठी खास टिप्स

केसांचे तुटणे कमी करण्यासाठी सिल्क किंवा साटनचा पिलोकेस वापरा. यामुळे केसांचे घर्षण कमी होते.

Esakal

महत्त्वाच्या टिप्स

केस कोरडे ठेवा: ओले केस बांधू नका.

पोषण द्या: झोपण्यापूर्वी केसांना तेल किंवा मास्क लावा.

ट्रिमिंग करा: स्प्लिट एंड्स कमी करण्यासाठी केसांचे नियमित ट्रिमिंग करा.

Esakal

फक्त एका रात्रीत फरक दिसेल! नितळ त्वचेसाठी 'या' 3 गोष्टी आहेत जादुई उपाय

Esakal

येथे क्लिक करा