Aarti Badade
मेथीचे दाणे (Fenugreek Seeds) केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. ते केसांची वाढ उत्तेजित करतात, मुळे मजबूत करतात आणि केसांना नैसर्गिक चमक देतात.
Sakal
मेथीचा हेअर मास्क तयार करण्यासाठी, मेथीचे दाणे एका वाटीत घेऊन ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.
Sakal
सकाळी भिजवलेले मेथीचे दाणे मिक्सरमध्ये काढून त्याची घट्ट आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा. वाटताना आवश्यक असल्यास थोडे पाणी वापरा.
Sakal
तुम्ही पेस्टमध्ये नारळाचे तेल (Coconut Oil) किंवा दही (Curd) मिसळू शकता. यामुळे केस हायड्रेटेड राहतील आणि त्यांना अतिरिक्त पोषण मिळेल.
Sakal
तयार झालेली मेथीची पेस्ट केसांच्या मुळांवर (टाळूवर) आणि संपूर्ण केसांवर लावा. हलक्या हातांनी मसाज करा, जेणेकरून पेस्ट मुळांपर्यंत पोहोचेल.
sakal
हा हेअर मास्क केसांवर सुमारे एक तास राहू द्या. नंतर साध्या पाण्याने किंवा सौम्य शॅम्पूने (Mild Shampoo) केस स्वच्छ धुऊन टाका.
Sakal
केसांची वाढ उत्तेजित होते,केस जाड आणि चमकदार दिसतात,केसांची मुळे मजबूत होतात.,टाळूचे आरोग्य सुधारते.
Sakal
Beetroot Lip Balm
Sakal