Anushka Tapshalkar
बहुतांश वेळी तिन्ही सांजेनंतर जेव्हा आपलं मन कमकुवत असतं, तेव्हा स्वतःबद्दल संशय येणारे किंवा नकारात्मक विचार मनात येऊ लागतात.
Negative Thoughts
sakal
मात्र या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष केल्यास मानसिक गोंधळ उडतो, आपली ऊर्जा वाया जाते आणि परिणामी लहान अडथळे मोठे होतात.
Negative Thoughts Create a Cluster in Mind
sakal
पण वास्तविक पाहता नकारात्मक विचार जास्त काळ टिकत नाहीत. हे विचार कायमस्वरूपी नसल्यामुळे पुढील उपाय फायदेशीर ठरतात.
Negative thoughts are Permanant
sakal
कोणत्याही प्रकारचा ताण असेल, तर तो कागदावर उतरवल्याने मन मोकळं होतं. तसेच लिहून काढलेले विचार पुन्हा वाचल्यास अधिक स्पष्टता मिळते आणि डोक्यातील गोंधळ कमी होतो.
Note Down the Thoughts
sakal
डोक्यात सतत नकारात्मक विचार येत असतील, तर काही वेळासाठी डोळे मिटून समस्यांशिवाय आयुष्य कसं असेल याची कल्पना करा. यामुळे मन आणि शरीर दोन्ही हलकं होतं. आयुष्याकडे बघण्याच्या नवीन दृष्टिकोन मिळतो.
Think of a Problem Free Life
sakal
एखाद्या गोष्टीची चिंता करत बसण्यापेक्षा, त्यातून बाहेर पडण्याच्या शक्यतांकडे लक्ष केंद्रित करा. प्रॉब्लेम फ्री आयुष्यासाठी एक छोटा सकारात्मक पाऊल उचललं आणि समस्या सोडवण्याकडे व कृतीकडे लक्ष दिलं, तर नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात.
Focus on Possibilities
sakal
नकारात्मक विचार डोक्यात येतच राहतील, पण त्यासाठी मनाला काही नवीन सवयी लावल्यास नकारात्मक विचारांना वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली जाते. यामुळे मन हलकं होतं आणि नकारात्मकतेचा परिणाम कमी करून स्थिरता वाढते.
Build Healthym Habits for Mind
sakal
ओव्हरथिंकिंगमुळे रात्री झोप लागत नाही? या ९ सायकोलॉजी ट्रिक्स देतील उत्तम परिणाम
Can't Sleep at Night Due to Overthinking
sakal