Aarti Badade
सतत काळजी (Constantly Worrying) करण्याची सवय अनेकांना असते.यामुळे मनःशांती हरवते आणि जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.चिंता कमी करून जीवनावरील नियंत्रण (Control) पुन्हा मिळवण्यासाठी हे प्रभावी मार्ग वापरा.
Sakal
मनात येणाऱ्या सर्व चिंता लहान चिठ्ठीवर लिहा आणि एका जारमध्ये ठेवा. आठवड्यातून एकदा वाचा तुम्हाला दिसेल की, बऱ्याच चिंता निरर्थक होत्या किंवा आपोआप सुटल्या आहेत.यामुळे मनाला लगेच शांती मिळेल.
Sakal
दररोजची सुरुवात तीन सकारात्मक गोष्टी (Positive Things) लिहून करा, ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ (Grateful) आहात.
Sakal
सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने तुमचा दृष्टिकोन बदलतो आणि चिंतेची भावना नैसर्गिकरित्या कमी होते.
Sakal
तुमच्या चिंतांना लेखन, चित्रकला किंवा हस्तकला यांसारख्या सर्जनशील कामांमध्ये वळवा.
Sakal
या कामांमध्ये व्यस्त राहिल्यास मन काळजीपासून विचलित होते.यामुळे तुम्हाला समाधानाची भावना मिळते.
Sakal
डोळे मिटून कल्पना करा की, तुम्ही सर्व चिंतांवर मात केली आहे आणि ध्येय साध्य करत आहात.
Sakal
सकारात्मक परिणाम दृश्यांकित केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि चिंतेची भावना कमी होते.
Sakal
ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत, त्या स्वीकारायला शिका.प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची गरज सोडून द्या. जे तुमच्या नियंत्रणात आहे, फक्त त्यावर लक्ष केंद्रित करा.
Sakal
नकारात्मक बातम्या आणि सोशल मीडियाचा सततचा मारा चिंता वाढवतो.सोशल मीडियावरील वेळ मर्यादित करा आणि जास्त विचार न करता माहितीसाठी विश्वसनीय स्रोतांचा वापर करा.
Sakal
हे ६ सोपे मार्ग तणाव कमी करून तुम्हाला जास्त उत्साही बनवतील.या टिप्सचा वापर करून तुमच्या जीवनावरील नियंत्रण पुन्हा मिळवा!
Sakal
Sakal