प्रायव्हेट फोटो किंवा व्हिडिओ लीक झालाय? घाबरु नका, 'या' वेबसाईटची होईल मोफत मदत

Yashwant Kshirsagar

दुष्परिणाम

डिजिटल जगाचे जितके फायदे आहेत तितकेच त्याचे दुष्परिणामही आहेत. आजकाल खाजगी फोटो किंवा व्हिडिओ ऑनलाइन शेअर केले जात असल्याची तक्रार करणे सामान्य झाले आहे.

Remove Leaked Photos

|

esakal

खासगी फोटो

जर तुमचे किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचे खाजगी फोटो वेबसाइट किंवा सोशल मीडिया साइटवर पोस्ट केले गेले असतील, तर तुम्ही ते आता काढून टाकू शकता तेही अगदी मोफत

Remove Leaked Photos

|

esakal

मदत

हे करण्यासाठी, तुम्हाला StopNCII.org ची मदत घ्यावी लागेल. ही वेबसाइट SWGfL नावाच्या आंतरराष्ट्रीय धर्मादाय संस्थेचा भाग आहे.

Remove Leaked Photos

|

esakal

लाखोंना फायदा

ते यूजरच्या संमतीशिवाय ऑनलाइन शेअर केलेले खाजगी फोटो काढून टाकण्याचे काम करतात. आतापर्यंत लाखो आक्षेपार्ह फोटो काढून टाकले आहेत. वेबसाईट कसे कार्य करते याबद्दल अधिक जाणून घेऊया.

Remove Leaked Photos

|

esakal

मोफत सुविधा

StopNCII म्हणजे Stop Non-Consensual Intimate Image Abuse म्हणजे संमतीशिवाय घेतलेल्या इंटिमेट इमेजचा गैरवापर. हे एक मोफत साधन आहे जे संमतीशिवाय घेतलेल्या इंटिमेट इमेजच्या गैरवापरामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

Remove Leaked Photos

|

esakal

धर्मादाय संस्था

StopNCII.org हे SWGfL चा भाग असलेल्या रिव्हेंज पॉर्न हेल्पलाइनद्वारे चालवले जाते. SWGfL ही एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धर्मादाय संस्था आहे जी युजर्सना हानीपासून वाचवण्यासाठी तंत्रज्ञानाची उपलब्धता असावी म्हणून अस्तित्वात आली आहे.

Remove Leaked Photos

|

esakal

स्थापना

SWGfL ची स्थापना २००० मध्ये झाली आणि ती जगभरातील असंख्य भागीदार आणि भागधारकांसोबत काम करते जेणेकरून ऑनलाइन प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित होईल. आता ते ही बेबसाईट कार्य करते ते समजून घेऊया.

Remove Leaked Photos

|

esakal

केस तयार करणे

या वेबसाइटवर पीडित व्यक्तीची केस तयार करण्यासाठी, होमपेजवर Create Case पर्याय मिळेल.

Remove Leaked Photos

|

esakal

माहिती द्या

त्यानंतर तुम्हाला नऊ टप्प्यांमध्ये तुमच्या फोटो किंवा व्हिडिओबद्दल माहिती देण्यास सांगितले जाईल. ही माहिती दिल्यानंतर, तुमच्या डिव्हाइसवरून फोटो किंवा व्हिडिओ स्कॅन करून हॅश व्हॅल्यू तयार केली जाईल.

Remove Leaked Photos

|

esakal

हॅश व्हॅल्यू

त्यानंतर StopNCII हे हॅश व्हॅल्यू त्याच्या भागीदारांसोबत शेअर करेल, जे नंतर त्या हॅश व्हॅल्यूशी जुळणारा कंटेट काढून टाकतील.

Remove Leaked Photos

|

esakal

ऑनलाइन शोध

StopNCII वेळोवेळी त्या हॅश व्हॅल्यूशी जुळणाऱ्या कंटेंटसाठी ऑनलाइन शोध घेते आणि ते काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू ठेवते. केस तयार केल्यानंतर, तुम्हाला एक आयडी दिला जाईल, जो तुमच्या केसच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास मदत करेल.

Remove Leaked Photos

|

esakal

भागीदार कंपन्या

StopNCII च्या भागीदार कंपन्यांमध्ये Meta सह सोशल मीडिया कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना तुमच्या हॅश व्हॅल्जूज शेअर केल्या जातात आणि मग त्या कंपन्या विनासमंती वापरलेल्या कंटेटवर कारवाई करतात.

Remove Leaked Photos

|

esakal

जगातील अत्यंत विषारी मासा; खायचं तर दूर स्पर्श करताच होतो माणसाचा मृत्यू

Stonefish Most Poisonous Fish

|

esakal

येथे क्लिक करा