Vrushal Karmarkar
वानखेडे स्टेडियम हे केवळ एक क्रिकेटचे मैदान नाही, तर कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या भावना, आठवणी आणि अभिमानाचे प्रतीक आहे.
वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, या मैदानाची निर्मिती एका अपमानातून झाली?
१९७३ मध्ये विधानसभाध्यक्ष शेषराव वानखेडे यांच्याकडे काही युवा आमदार आले आणि आमदार-मंत्र्यांमधील क्रिकेट सामन्याची कल्पना मांडली.
त्या वेळी मुंबईत ब्रेबॉर्न हे एकमेव क्रिकेट मैदान होते. पण सीसीआयचे अध्यक्ष विजय मर्चंट यांनी मराठी आमदारांची मागणी धुडकावली.
मर्चंट यांच्या या अपमानजनक वक्तव्यामुळे वानखेडेंनी मैदान उभारण्याची जिद्द घेतली. “तुम्ही फक्त जागा द्या, पैशाचा बंदोबस्त आम्ही करू,” असा निर्धार केला.
मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मदतीने मैदानासाठी जागा मिळाली आणि फक्त १३ महिन्यांत वानखेडे स्टेडियम उभं राहिलं.
मराठी माणसाच्या अपमानाचा बदला घेत वानखेडेंनी ब्रेबॉर्नपासून अवघ्या १ किमी अंतरावर नवे मैदान उभारले – आजचे वानखेडे स्टेडियम!
या मैदानावर सुनील गावसकर, विनोद कांबळी, रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
२०११ मध्ये भारताने वानखेडेवरच विश्वचषक जिंकून इतिहास रचला. महेंद्रसिंग धोनीचा षटकार आजही चाहत्यांच्या आठवणीत आहे.
शेषराव वानखेडे यांच्या जिद्द, स्वाभिमान आणि नेतृत्वामुळे हे स्टेडियम उभं राहिलं. त्यांचे नाव या ऐतिहासिक मैदानाला सार्थ आहे.
शिवरायांचा पहिला शत्रू कोण?