होर्मुजमध्ये जहाजं तरंगत ठेवायला किती खर्च येतो? सध्या किती जहाजं उभी आहेत?

संतोष कानडे

इराण

इराणने होर्मुजची समुद्रधुनी बंद केल्याने साधारण ३ हजारांपेक्षा जास्त जहाजं तिथेच अडकून पडलेली आहेत. तर २० हजार खलाशी त्या जहाजांवर आहेत.

होर्मुजची समुद्रधुनी

अडकून पडलेल्या जहाजांमध्ये तेलवाहू टँकर्स, गॅस टँकर्सचा समावेश आहे. भारताची साधारण २२ जहाजं इव्हॅक्युएशन लिस्टमध्ये आहेत.

जहाज

होर्मुजमधून दररोज साधारण १३८ जहाजे ये-जा करतात. मात्र सध्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त वाहतूक घटल्याची नोंद आहे.

दररोजचा खर्च

जेव्हा एखादे मोठे जहाज संथ गतीने चालत रहाते किंवा समुद्रात थांबून असते, तेव्हा त्याचा दररोजचा खर्च प्रचंड असतो.

इंधन

हा खर्च दिवसाला २५ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत इतका असतो. यामध्ये इंधन, कर्मचाऱ्यांचं वेतन, देखभाल आणि विम्याचा समावेश आहे.

वॉर रिस्क

होर्मुज हा भाग राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने तिथे जहाजांना सामान्य विम्याव्यतिरिक्त 'वॉर रिस्क' प्रिमियम भरावा लागतो.

विमा

जर युद्धजन्य किंवा कुठल्याही कारणाने तणावाची परिस्थिती असेल तर जहाजाच्या एकूण किंमतीच्या ०.१ टक्के ते ०.५ टक्के विमा भरावा लागतो.

डेमरेज शुल्क

एखाद्या मोठ्या जहाजासाठी हा अतिरिक्त खर्च २० लाख रुपये ते ८० लाख रुपये असतो. एखाद्या परवानगीसाठी जहाज थांबलेले असेल तर डेमरेज शुल्क लागू होतो.

५० ते ६० लाख रुपये

थोडक्यात, होर्मुजमध्ये फक्त एक दिवस जहाज तरंगत ठेवण्यासाठी ५० ते ६० लाख रुपये खर्ची पडतात.

हजारो जहाजं ताटकळत

मागच्या १५ ते २० दिवसांपासून हजारो जहाजं इराणने होर्मुजच्या समुद्रधुनीत ताटकळत ठेवलेली आहेत. त्यामुळे त्यांचा खर्च कितीतरी कोटी रुपये झालाय.

भूगर्भात कच्चं तेल कसं तयार होतं?

<strong>येथे क्लिक करा</strong>