होर्मुजमधून भारतात येण्यासाठी जहाजाला किती दिवस लागतात? वेग किती असतो?

संतोष कानडे

होर्मुज

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारतात येण्यासाठी जहाजाला लागणारा वेळ हा वेग, हवामान आणि लोकेशनवर अवलंबून आहे.

तेलाचा टँकर

तेलाच्या टँकरचा वेग साधारणपणे ताशी २७ ते २८ किमी इतका असतो. एक हजार किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी ३७ तासांपेक्षा जास्तीचा वेळ लागतो.

गुजरात

गुजरातमधल्या कांडला बंदर येथे पोहोचण्यासाठी जहाजाला साधारण एक हजार किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं.

मुंबई

होर्मुजमधून जहाज मुंबईत पोहोचण्यासाठी साधारण दीड हजार किलोमीटर एवढं अंतर पार करावं लागतं. त्यासाठी साधारण ५३ तास लागतात.

युद्धासारखे प्रसंग

इतर काही अडचणी असतील, समजा समुद्र खवळलेला असेल किंवा युद्धासारखे प्रसंग असतील अथवा जहाजाचा वेग कमी असेल तर ३ ते ५ दिवस लागतात.

विनाथांबा प्रवास

तेलाचे टँकर हे खूप मोठे आणि वजनाने जड असतात,त्यामुळे ते विनाथांबा प्रवास करतात. पण त्यांचा वेग मर्यादित असतो.

भारत

सध्या भारताचे १५ पेक्षा जास्त जहाजं इराणच्या होर्मुज सामुद्रधुनीत अडकून पडलेले आहेत. मात्र हा मार्ग आता खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तेलाची भूक

अमेरिकेने युद्धविरामाची घोषणा केलेली आहे. त्यामुळे काही अटींसह हा मार्ग खुला होऊन अनेक देशांची तेलाची भूक भागवली जाऊ शकते.

हरममधल्या 'या' दोन इराणी महिलांमुळे मुघल साम्राज्याला चार चाँद लागले

Mughal Harem

|

esakal

<strong>येथे क्लिक करा</strong>