Monika Shinde
आजकाल चांगला पगार आणि कमी ताण असलेली नोकरी मिळवणं कठीण वाटतं, पण काही व्यवसाय असे आहेत जे खूपच सोपे, मनोरंजक आणि आरामदायी आहेत. जाणून घ्या काही अशाच अनोख्या पण सोप्या नोकऱ्यांविषयी
एखाद्याच्या घराची काळजी घ्या, झाडू मारा, पाणी घाला, पत्रे गोळा करा आणि त्यासाठी पैसे मिळवा. घराची काळजी घेणे हे सर्वात आरामदायी आणि जबाबदार कामांपैकी एक आहे.
जर तुम्हाला जिम, व्यायाम आणि आरोग्याची आवड असेल, तर फिटनेस कोच होणं उत्तम पर्याय आहे. इतरांना तंदुरुस्त बनवताना तुम्ही स्वतःही फिट राहाल, आणि त्यासाठी उत्तम मानधनही मिळेल.
गेम खेळत पैसे मिळवायचे किती छान वाटतं ना? गेम टेस्टर म्हणून तुम्हाला नवे गेम्स सर्वप्रथम खेळण्याची संधी मिळते आणि त्रुटी शोधण्याचं काम करावं लागतं.
ही नोकरी स्थिर आणि प्रतिष्ठेची आहे. लोकांची दृष्टी तपासणे, नंबर ठरवणे, आणि काही डोळ्यांचे आजार ओळखणे हे मुख्य काम असते. एकदा शिक्षण पूर्ण झालं की ही नोकरी खूप सोपी आणि उच्च पगाराची ठरते.
दररोज गोंडस कुत्र्यांना फिरायला नेणं हे काम म्हणजे आनंदच आनंद. कमी ताण, शुद्ध हवा आणि रोजच्या व्यायामाची जोडही आहे.
जर तुम्हाला बाहेरचं काम आवडत असेल, तर ही नोकरी योग्य आहे. पूल स्वच्छ ठेवणे, पाण्यातील रासायनिक संतुलन राखणे आणि नियमित तपासणी करणे हे मुख्य काम.
वाइन चाखणे आणि लोकांना योग्य वाइनची शिफारस करणे हेच तुमचं काम. उच्च दर्जाच्या रेस्टॉरंट्स आणि वाइनरीजमध्ये या क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
फॅशनची आवड आणि स्टाईल सेन्स असेल तर ही नोकरी तुमच्यासाठीच आहे. ग्राहकांसाठी कपडे निवडणे, लूक डिझाईन करणे आणि नवनवीन ट्रेंड फॉलो करणे मजा आणि करिअर दोन्ही मिळवा