Anushka Tapshalkar
बऱ्याचदा काम करताना अचानक अनेक जण छातीत दुखत असल्याची तक्रार करतात.
छातीत दुखण्याची अनेक करणे असू शकतात, जसेकी अपचन, गॅस, किंवा गरजे पेक्षा जास्त वजन उचलणे. परंतु याव्यतिरिक्त छातीत दुखणे हे अतिरिक्त स्ट्रेसमुळे सुद्धा होऊ शकते. हे दुखणे कमी करण्यासाठी पुढील उपायांचा वापर करा.
एका शांत ठिकाणी बसा आणि डोळे मिटून हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. यासाठी ४-७-८ टेक्निक वापरू शकता, ज्यामध्ये सेकंद श्वास घ्या, ७ सेकंद रोखा आणि ८ सेकंद सोडा. यामुळे मन शांत होते आणि छातीतील ताण हलका होतो.
हे करण्यासाठी सर्वात आधी एक शांत जागा निवड व तिथे तुमच्या सोयीनुसार एका पोझिशन मध्ये बसा. नंतर हळूहळू नाकाने श्वास घ्या आणि हळूहळू तोंडाने सोडा. यामुळे मन हलके, शांत आणि रिलॅक्स होते.
चालणे, स्ट्रेचिंग किंवा हलकी योगासनं यामुळे शरीर आणि मन रिलॅक्स होते. छातीतला ताण कमी करण्यासाठी "कोब्रापोज" किंवा "कॅट-काऊ स्ट्रेच" करण्याचा फायदा होतो.
तुम्हाला शांत वाटणारे किंवा आवडते म्युझिक ऐका. म्युझिक थेरपीमुळे मनाचा गोंधळ कमी होतो आणि हार्टरेट सामान्य होतो.
सर्वत शेवटचा आणि सोपा उपाय म्हणजे छातीवर हलक्या बोटांनी टॅपिंग करायचं. यामुळे ताणामुळे होणाऱ्या वेदनेवर तात्पुरता मानसिक दिलासा असतो किंवा यामुळे लक्ष विचलित होते ज्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.