Aarti Badade
तुमचा ब्लड ग्रुप (Blood Group) कोणता आहे? हा प्रश्न आता फक्त रक्तदानापुरता मर्यादित राहिलेला नाही.
Sakal
रक्तगट हा आपल्याला भविष्यात कोणता आजार होऊ शकतो, हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
Sakal
संशोधनाने ब्लड ग्रुप आणि 'अर्ली स्ट्रोक' (तरुण वयातील पक्षाघात) यांच्यातील थेट संबंध उघड केला आहे. हा धोका वयाच्या ६० वर्षांपूर्वी स्ट्रोक येण्याशी संबंधित आहे.
Sakal
संशोधनानुसार, ज्या लोकांचा ब्लड ग्रुप 'A' (विशेषतः A1 उपप्रकार) आहे, त्यांना तरुण वयात स्ट्रोक येण्याचा धोका इतर रक्तगटांच्या लोकांपेक्षा जास्त आहे.हा धोका तब्बल १६ टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळले.
Sakal
हा अभ्यास कोणताही छोटा नव्हता; यात ४८ वेगवेगळ्या जेनेटिक अभ्यासांचा डेटा तपासण्यात आला.
Sakal
१८ ते ५९ वयोगटातील १७,००० स्ट्रोक आलेल्या लोकांची तुलना ६ लाख निरोगी लोकांशी केली गेली.
Sakal
संशोधकांना यामागे नेमकं कारण अजून सापडलेले नाही.पण 'A1' ब्लड ग्रुपचा थेट परिणाम रक्ताच्या गुठळ्या (Clotting Factors) तयार होण्याच्या प्रक्रियेवर होतो, ज्यामुळे गुठळी होण्याची शक्यता वाढते.
Sakal
तरुण वयात स्ट्रोक येण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे.या घटनेतून वाचलेल्या रुग्णांना अनेक वर्षे अपंगत्वाचा सामना करावा लागतो.
Sakal
ब्लड ग्रुप आणि अनुवांशिकता (Genetics) स्ट्रोकचा धोका कमी-जास्त करण्यात मोठी भूमिका बजावतात.
Sakal
या माहितीमुळे भविष्यात धोका जास्त असलेल्या लोकांना लवकर ओळखणे आणि त्यांच्यासाठी खास प्रतिबंधात्मक उपाय तयार करणे सोपे होईल.
Sakal
Sakal