रोज जिमला जाणे कठीण वाटतंय? मग करा 'या' एक्झरसाइज

सकाळ डिजिटल टीम

फिटनेस

धावपळीच्या जीवनशैलीत रोज जिमला जाणे कठीण असते, पण घरीच सोपे व्यायाम करून तुम्ही तंदुरुस्त राहू शकता

बिअर क्रॉल्स

पुशअप पोझिशनमध्ये येऊन हात-पाय समन्वय साधत पुढे सरकण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम स्नायू बळकट करतो.

Exercises | Sakal

इंच वर्म

उभे राहून हात पुढे नेत पुशअप पोझिशन घ्या आणि पाय जवळ आणा. यामुळे शरीर मजबूत होते.

Exercises | Sakal

लंजेस

डावा पाय पुढे वाकवा, गुडघा सरळ ठेवा आणि शरीर ताठ ठेऊन पुन्हा उभे राहा. दोन्ही पायांनी करा.

Exercises | Sakal

माउंटन क्लाइंबर्स

पुशअप पोझिशन घ्या आणि एक पाय पुढे आणा, नंतर दुसरा. शक्य तितक्या वेगाने करा, यामुळे पोट आणि मांड्यांची चरबी कमी होते.

Exercises | Sakal

जंपिंग जॅक

उडी मारून पाय बाहेर टाका आणि हात वर उचला. पुन्हा उडी मारून पूर्वस्थितीत या. किमान २० वेळा करा.

Exercises | Sakal

नृत्य आणि योगासने

डान्स हा उत्तम कार्डिओ आहे, तर सूर्यनमस्कार आणि योगासने शरीराची लवचिकता वाढवतात आणि मानसिक आरोग्य सुधारतात.

Exercises | Sakal

दैनंदिन जीवन

लिफ्टऐवजी जिने वापरा, शक्य तितके चालण्याचा प्रयत्न करा, आणि स्वतःची कामे स्वतः करा. संतुलित आहार आणि पुरेशी झोप घ्या.

Exercises | Sakal

आवळ्याच्या बिया हृदयासह आणखी 5 समस्यांवर करतात मात

amla seeds | Sakal
येथे क्लिक करा