Aarti Badade
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी फक्त व्यायाम नव्हे, तर आहारातही योग्य बदल करणे आवश्यक आहे. पचनसंस्था व्यवस्थित राहण्यासाठी काही महत्त्वाचे आहार बदल करा.
आपल्या आहारात प्रथिनयुक्त पदार्थ जसे की दही, ताक, पनीर, डाळी, ड्रायफ्रूट्स, आणि ओट्स समाविष्ट करा. हे शरीरासाठी फायदेशीर असून पचन सुधारतात.
ताजी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य (whole grains) यांचा आहारात समावेश करा. यामुळे पचन सुधारते आणि चरबी वाढत नाही.
साखरयुक्त पेये, जंक फूड आणि तळलेले पदार्थ टाळा. यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते.
रोज सकाळी गरम पाणी किंवा लिंबूपाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकली जातात आणि वजन कमी करण्यास मदत होते.
दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे. ह्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
नियमित व्यायाम, झोपेची योग्य वेळ (रात्री १०-११ च्या आत झोपणे), आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणारे तंत्र अवलंबा. यामुळे पोटावरील चरबी कमी होईल.