Anushka Tapshalkar
स्मोकिंग हे बऱ्याच काळापासून लागलेले व्यसन आहे. जे सोडणे कठीण तर जातेच परंतु त्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळीच ते सोडण्याचा निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
स्मोकिंग सारखी दिर्घकाळ चालत असलेली सवय मोडणे अवघड काम आहे. पण तुम्ही पुढे दिलेल्या सोप्या आणि फायदेशीर टिप्स फॉलो केल्या तर हे व्यसन सोडण्यासाठी मदत होईल.
स्मोकिंग सोडण्यासाठी एक ठराविक तारीख ठरवा. परंतु दोन आठवड्याच्या आतील तारीख निवड आणि तूमच्या घरच्यांना व मित्रांना सांगा जेणेकरून ते तुम्हाला पाठिंबा देऊ शकतील.
हे व्यसन सोडण्यासाठी कठोर निश्चय करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्वतःला वारंवार आठवण करून द्या की हे आपली आरोग्यसाठी किती घटक आहे आणि तुमच्या निर्णयावर ठाम राहा.
निरोगी आयुष्यासाठी जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. रोज योगा, व्यायाम, चालणे अशा शारीरिक हालचाली करा. ध्यान करा. संतुलित आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप घ्या.
जे लोक स्मोकिंग सोडण्यात यशस्वी झाले आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. त्यांच्याशी बोला, त्यांच्याकडून काही टिप्स घ्या किंवा ऑनलाईन उपलब्ध असलेल्या सपोर्ट ग्रुप्समध्ये सामील व्हा.
स्मोकिंगची तल्लफ आली की लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे वळवून मन विचलित करा. अशा वेळेस शारीरिक हालचाली करा, तुमचे छंद जोपासा किंवा एखाद्या कामात लक्ष केंद्रित करा.
स्मोकिंगची ओढ कमी करण्यासाठी आणि ती नियंत्रणात ठेवण्यासाठी निकोटीन पॅच, गम, लोझेंज, इनहेलर किंवा नेझल स्प्रेचा वापर करा. मात्र योग्य पर्याय निवडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
स्मोकिंग सोडताना मानसिक आधार अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुमच्या कुटुंबाचा, मित्र- मैत्रिणींचा किंवा तज्ज्ञांचा पाठिंबा घ्या.
जर इतर उपाय प्रभावी ठरत नसतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने बुप्रोपिऑन किंवा वॅरेनिक्लिन सारखी औषधे तुम्ही घेऊ शकता.
स्मोकिंग सोडण्याच्या प्रत्यके टप्प्यावर स्वतःला काहीतरी खास गिफ्ट करा आणि स्वतःचे कौतुक करा. यामुळे तुमचा हा व्यसनमुक्तीचा प्रवास अजून आनंददायी आणि सुखकर होईल.