सकाळ डिजिटल टीम
जेव्हा तुम्ही खूप थकलात, तेव्हा चांगली झोप लागली की शरीर आणि मनाला आराम मिळतो. पण आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना नीट झोप येत नाही.
चांगली झोप घेतल्याने केवळ शरीरालाच आराम मिळत नाही, तर ताजेतवाणेपणाही येते. झोपेची गुणवत्ता तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला सकारात्मक रीतीने प्रभावित करते.
झोप येत नसेल तर त्यामागे पोषक तत्वांची कमी असू शकते. शरीराला आवश्यक पोषण मिळणे महत्वाचे आहे.
प्रौढ व्यक्तींनी दररोज 7 ते 8 तासांची चांगली झोप घेणं आवश्यक आहे. योग्य वेळी झोप घेणं महत्त्वाचं आहे.
झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स दूर ठेवा. यामुळे तुमची झोप व्यवस्थित होईल.
खूप थकल्यानंतर झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे तुम्हाला ताजेतवाणेपणाची भावना मिळते आणि स्नायूंचा थकवा दूर होतो.
पायांनी तेलाने मसाज करणे देखील चांगली झोप मिळवण्यासाठी फायदेशीर आहे. पायांचे टाच आणि पोटऱ्यांना तेलाने मालिश केल्याने आराम मिळतो.
झोपेच्या वेळी योगा करणे देखील फायदेशीर आहे. तुमच्या मानसिक तणावात कमी येण्यासाठी काही सोपे आसन करू शकता. शवासन, सुखासन आणि बुद्ध कोनासन ही झोपेच्या वेळी करावीत अशी काही योगासनं आहेत.
चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी दररोज मेडिटेशन करा. यामुळे मन शांत होईल आणि चांगली झोप लागेल.