Aarti Badade
आजकाल अनेकांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. पण अनेकदा लोकांना स्वतःलाच याची जाणीव नसते.
स्टॅटिन नावाची औषधे यकृतात कोलेस्ट्रॉल बनवणारे एन्झाइम ब्लॉक करतात. तरीसुद्धा काही वेळा ही औषधे काम करत नाहीत.
औषधे घेतल्यानंतरही जर कोलेस्ट्रॉल कमी होत नसेल, तर जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे."
साखरच नव्हे, तर भात, रोटी, धान्ये कमी खा. यामुळे औषधांचा परिणाम टिकून राहतो.
योग्य अन्न खा,पुरेशी झोप घ्या,दररोज व्यायाम करा.यामुळे शरीरातील जळजळ कमी होऊन कोलेस्ट्रॉल आपोआप कमी होतो.
फक्त औषधांवर अवलंबून न राहता, दीर्घकाळ कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत सुधारणा करा.
स्टॅटिन्स काम करत नसतील, तरी नैसर्गिक मार्गाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येतो. आहार, व्यायाम आणि चांगली जीवनशैली हाच खरा उपाय!