Aarti Badade
पोट साफ होत नाही? मग सकाळी रिकाम्या पोटी खा पपई – फायबरने भरलेली ही फळं पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते.
पपईमध्ये फायबर, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे A, C, E, K मुबलक असतात.
१५७ ग्रॅम पपईत फक्त ६८ कॅलरीज असतात. सकाळी पपई खाल्ल्यास भूक उशीराने लागते आणि वजन नियंत्रणात राहते.
पपईतील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करतात, रक्तप्रवाह सुधारतात.
पपईमधील एंजाइम मृत पेशी काढतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळवून देतात.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खा – यामुळे मलावष्टंभ दूर होतो आणि पोट साफ राहते.
पपई खाल्ल्याने पाळी वेळेवर येते आणि तीव्रता कमी होते – महिलांसाठी खास फायदेशीर.
पपईतील लायकोपीन हे अँटीऑक्सिडंट कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस घटवतं.
आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी वैयक्तिक प्रकृतीनुसार पपई खाण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.