Anushka Tapshalkar
रात्री ७–८ मनुका पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी चावून खा.
यामुळे हिमोग्लोबिन नैसर्गिकरित्या वाढतं.
दररोज १ खजूर खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक साखर मिळते आणि ऊर्जा पातळी वाढते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूर खूपच उपयुक्त आहे.
गूळ आणि फुटाणे हे आयर्न वाढवणारे उत्तम संयोजन आहे! दररोज थोड्या प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
पालक, शेवगा आणि बीटरूट आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करा. या भाज्या आयर्न आणि फोलेटने भरपूर असून रक्तनिर्मितीला चालना देतात.
बीटरूटमध्ये आयर्न, फोलेट आणि अँटिऑक्सिडेंट्स मुबलक. रोज सलाड/ज्यूसमध्ये समावेश करा.
आवळ्यातील व्हिटॅमिन C शरीराला आयर्न शोषायला मदत करतं. हिमोग्लोबिन कमी असल्यास रोज आवळा खाणं अत्यंत उपयुक्त.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
How to Keep Your Body Cool in Summer Naturally
sakal