Aarti Badade
रात्री १ ते ३ वाजता झोपेतून जाग येणे हे लिव्हरच्या कार्याशी संबंधित असू शकते. लिव्हरचे कार्य नीट न झाल्यास रक्तप्रवाहावर परिणाम होतो, ज्यामुळे झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो.
मानसिक तणावामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. तणावामुळे झोपेत विचित्र स्वप्ने पडणे, चिडचिड होणे आणि झोपेतून वारंवार जाग येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
सर्दी-खोकला, अँटी-डिप्रेसेंट्स यासारखी औषधे झोपेवर परिणाम करू शकतात. या औषधांमुळे झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे झोपेतून वारंवार जाग येणे होऊ शकते.
स्लीप ॲप्निया म्हणजे झोपेत श्वासोच्छवासात अडथळा येणे. यामुळे रात्री झोपेतून जाग येणे, घोरणे आणि थकवा जाणवणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
हायपरसोम्निया म्हणजे रात्री चांगली झोप झाल्यानंतरही दिवसा खूप जास्त झोप येणे. यामुळे दिवसभरातील कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
झोपेच्या समस्यांवर उपाय म्हणून नियमित व्यायाम, तणाव व्यवस्थापन, योग्य आहार आणि झोपेची योग्य वेळ पाळणे आवश्यक आहे.
जर झोपेच्या समस्यांमध्ये सुधारणा होत नसेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य उपचार घेता येऊ शकतात.