Anushka Tapshalkar
तेलकट त्वचा, घाम, धूळ, आणि हार्मोन्स यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
रात्रीच्या वेळी त्वचेवर बॅक्टेरीया जमा होतो, त्यामुळे सकाळी चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.
रात्री उशिरा जागरण करून झोप अपूर्ण होते. हे देखील पिंपल्स येण्याचे कारण असू शकते.
अति ताण चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचा निस्तेज दिसते आणि पिंपल्स येतात.
परंतु घरगुती आणि सोप्या उपायांमुळे पिंपल्सची समस्या टाळता येऊ शकते.
सकाळी उठून उपाशी पोटी कोमट पाण्यात एक चमचा मध घालून त्याचे सेवन करा.
कोमट पाण्यात मध घालून प्यायल्याने पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते.
पिंपल्सचे डाग सुद्धा कमी होतात.
कोमट पाणी आणि मध यांचे सेवन केल्याने मऊ व उजळ त्वचा मिळते.