Aarti Badade
संपूर्ण चेहरा मुरुमांनी भरलेला आहे का? लसूण ही एक घरगुती आणि प्रभावी उपाय आहे.
भारतीय जेवणात वापरल्या जाणाऱ्या लसणामध्ये त्वचेसाठी आश्चर्यकारक गुणधर्म आहेत – याचा उपयोग आयुर्वेदात शतकानुशतकांपासून केला जातो.
लसूणमध्ये अॅलिसिन नावाचे संयुग असते, ज्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे ते मुरुम निर्मिती करणारे जीवाणू नष्ट करते.
लसणाचा थेट मुरुमांवर वापर केल्यास ते बॅक्टेरिया नष्ट करते, सूज कमी करते आणि जळजळ थांबवते – त्वचेला त्वरित आराम मिळतो.
लसूण रक्तप्रवाह सुधारतो, त्यामुळे त्वचेला आवश्यक पोषकतत्त्वे मिळतात आणि चेहरा अधिक उजळ आणि तजेलदार दिसतो.
थायोसल्फिनेट्ससारखे घटक त्वचेवर अँटीमायक्रोबियल म्हणून काम करतात – नियमित वापराने चेहरा स्वच्छ, निरोगी आणि मुरुममुक्त राहतो.
लसूण थेट त्वचेवर लावण्यापूर्वी थोडं पाणी किंवा मधात मिसळा, आणि थोड्या वेळापुरताच लावा जास्त वेळ ठेवल्यास चटका बसू शकतो.