Anushka Tapshalkar
आजकाल बऱ्याच जणांना रात्री झोप लागण्यात अडथळा येतो तसाच तुम्हालाही येतो का? मग हे सोपे व्यायाम शरीर आणि मन शांत करून तुम्हाला गाढ झोप घ्यायला मदत करतील.
नियमित व्यायाम केल्याने दिवसभराचा ताण कमी होतो, शरीर मोकळे होते आणि झोपेची गुणवत्ता वाढते. त्यामुले शांत झोपेसाठी, झोपण्यापूर्वी करायचे हे व्यायाम करणे आवश्यक आहे.
संध्याकाळी १५-२० मिनिटे चालल्याने तणाव हार्मोन्स (Cortisol) कमी होतात आणि मेलाटोनिनची निर्मिती होते, ज्यामुळे मन शांत होऊन गाढ झोप लागते.
हलक्या स्वरूपातील स्ट्रेचिंग केल्याने स्नायूंमधला ताठरपणा कमी होतो, शरीर सैल पडतं, आणि विना अडथळा झोप लागते.
रात्री झोपण्यापूर्वी काही हलकी योगासने केली जसेकी, बालासन, शवासन आणि विपरीत करणी (Legs up the wall pose), तर शरीर आणि मनाला शांतता मिळते, ताण कमी होतो आणि सहज झोप लागते.
संध्याकाळच्या वेळी स्लो आणि नियंत्रित पिलाटेज व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंमधला तणाव कमी होतो आणि शरीर अधिक हलके आणि मोकळे वाटते. त्यामुळे रात्री झोप शांत लागते.
स्नायूंना हलकेसे ताणून मग सैल सोडणे याला स्नायू शिथिलीकरण (Progressive Muscle Relaxation) असे म्हणतात. रात्री झोपण्यापूर्वी हे केल्याने शरीराचा तणाव कमी होतो, मन शांत होते, आणि झोप लागायला मदत होते.
हलक्या वजनाचे व्यायाम, जसे की बॉडीवेट स्क्वॉट्स आणि पुश-अप्स, केल्याने दिवसभराचा ताण कमी होतो आणि शरीर दमल्याने शांत झोप लागण्यास मदत होते.
४-७-८ श्वासोच्छ्वास तंत्रासारखे खोल श्वासनाचे व्यायाम झोपण्यापूर्वी केल्याने मन शांत होते, शरीर रिलॅक्स होते आणि पटकन झोप लागते.
जर हे उपाय करूनही तुम्हाला झोपण्यास अडचण येत असेल, तर चांगल्या झोपेसाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या!