तोंडाला पाणी सुटेल! नक्की ट्राय करा गावरान स्टाइल भरलेली मिरची

Aarti Badade

जेवणाची लज्जत वाढवा

वरण-भातासोबत तोंडी लावण्यासाठी भरलेली मिरची ताटात असेल तर जेवणाची चव दुप्पट होते.

Bharleli Mirchi recipe

|

Sakal

मिरचीची पूर्वतयारी

कमी तिखट मिरच्या स्वच्छ धुवून मधून उभ्या चिरून घ्या आणि हवे असल्यास त्यातील बिया काढून टाका.

Bharleli Mirchi recipe

|

Sakal

चविष्ट सारण तयार करा

एका बाऊलमध्ये शेंगदाणा कूट, बेसन, हळद, तिखट, गरम मसाला आणि धणे-जीरं पूड एकत्र करा.

Bharleli Mirchi recipe

|

Sakal

मसाल्यात आणा चटपटीतपणा

मसाल्यात आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि आंबट चवीसाठी लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर मिसळा.

Bharleli Mirchi recipe

|

Sakal

मिरचीमध्ये मसाला भरा

मसाला कोरडा राहू नये म्हणून थोडे तेल घालून तो प्रत्येक मिरचीमध्ये दाबून व्यवस्थित भरून घ्या.

Bharleli Mirchi recipe

|

Sakal

खमंग फोडणी आणि वाफ

पॅनमध्ये तेल गरम करून जीरं-हिंगाची फोडणी द्या आणि मिरच्या झाकण ठेवून वाफेवर ५ मिनिटे शिजवा.

Bharleli Mirchi recipe

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा

मिरच्या सर्व बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतल्या की तुमची खमंग भरलेली मिरची खाण्यासाठी तयार आहे.

Bharleli Mirchi recipe

|

Sakal

रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Benefits of eating apple daily

|

Sakal

येथे क्लिक करा