सकाळ डिजिटल टीम
उंची कमी असल्यास काही सोप्या टिप्स वापरून तुमचा लूक अधिक आकर्षक आणि उंच दिसू शकतो.
सेम रंगांचे कपडे घालण्यामुळे उंची जास्त दिसते. उदाहरणार्थ, कुर्ती आणि पायजामा एकाच रंगात असावे. गडद रंगांचा वापर करा, जसे गुलाबी, लाल, हिरवा.
आडव्या पट्ट्यांमुळे शरीर अधिक रुंद दिसू शकते. त्यामुळे उभ्या रेषांचे कपडे निवडा.
उभ्या रेषांमुळे शरीराचे प्रमाण योग्य दिसते. त्यावर अनबटन जॅकेट्स वापरा.
V-नेक कुर्ते, ब्लाऊज, टॉप किंवा टी-शर्ट तुमची उंची वाढवतात. यामुळे तुमचा चेहरा आणि गळा अधिक लांब दिसतो.
हाय वेस्ट जीन्स, स्कर्ट घालून पाय लांब दिसवू शकता. त्यावर एक साईझ मोठा टी-शर्ट किंवा क्रॉप टॉप घालावा.
छोट्या हॅन्डबॅग्स टाळा. मोठ्या किंवा मीडियम बॅग्जमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक उंच आणि आकर्षक दिसते.