Anushka Tapshalkar
तेल, सीरम किंवा केअर रूटीनपेक्षा कधी कधी केस गळणं हे शरीर देत असलेलं पहिलं इशाराचिन्ह असू शकतं.
Hair Fall
sakal
Dr Debraj Shome यांच्या मते केसांची मुळे पोषण, हार्मोन्स आणि ऑक्सिजनवर अवलंबून असतात. शरीरात ताण आला की सर्वात आधी परिणाम केसांवर दिसतो.
Hair Roots
sakal
अॅनिमिया नसतानाही आयर्न कमी असेल, तर केस गळू शकतात. विशेषतः महिलांमध्ये फेरिटीन कमी झालं तरी केसांच्या मुळांवर परिणाम होतो.
Iron Deficiency
sakal
हायपोथायरॉईड किंवा हायपरथायरॉईड—दोन्ही अवस्थांमध्ये डोक्यावर सर्वत्र केस पातळ होतात. पुरुष आणि महिलांमध्ये समान परिणाम दिसतो.
Thyroid
sakal
Alopecia Areata मध्ये गोल-गोल टक्कल पडतं. हा त्रास लुपस, विटिलिगो किंवा हाशिमोटो थायरॉईडायटिससारख्या आजारांशी जोडलेला असू शकतो.
Autoimmune Diseases
sakal
पुरुषांमध्ये लवकर टक्कल पडणं हे मेटाबॉलिक सिंड्रोम, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांसारख्या हृदयविकारांचा संकेत ठरू शकतो.
Hair Fall Problem in Male
sakal
आज केस गळतायत, पण कारण 2–3 महिने आधीचं असू शकतं—आजारी पडणं, वजन घटणं, ताण, औषधं किंवा भावनिक धक्का. त्यामुळे योग्य तपासणी अत्यंत गरजेची.
Hair Late Response
sakal