Aarti Badade
यामध्ये स्नायू अचानक आकुंचन पावतात, ज्यामुळे वेदना होतात.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास, स्नायू नीट काम करत नाहीत आणि गोळे येऊ शकतात.
कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियम कमी झाल्यास स्नायूंच्या कार्यावर परिणाम होतो आणि गोळे येतात.
जास्त शारीरिक हालचाल किंवा व्यायामाने स्नायू थकतात आणि गोळे येऊ शकतात.
मधुमेह, किडनीचे विकार, थायरॉईड किंवा रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांमुळेही पायात गोळे येऊ शकतात.
काही औषधे (उदा. diuretics, cholesterol कमी करणारी) पायात गोळे येण्याची शक्यता वाढवतात.
गरोदरपणात शरीरातील बदल आणि हार्मोन्समुळे पायात गोळे येऊ शकतात.
वात दोष असंतुलित झाल्यास पायात गोळे येऊ शकतात, असे आयुर्वेद सांगते.
पुरेसे पाणी प्या, संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा (स्नायूंना ताण न देता), गरम पाण्याने शेक घ्या.
जर पायात गोळे येण्याची समस्या वारंवार येत असेल किंवा जास्त त्रास होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.