Aarti Badade
कधी कंबरेत, तर कधी हातपायात दुखणं, झोप न येणे, थकवा जाणवणे ही अनेकांना जाणवणारी सामान्य समस्या आहे.
शरीरदुखीचे कारण बरेच वेळा सर्दी, ताप, जास्त वेळ उभं राहणं किंवा शारीरिक हालचाल कमी असणं असू शकतं.
साध्या स्वयंपाकघरात मिळणाऱ्या काही मसाल्यांनी तयार होणारं एक पेय शरीरदुखीवर प्रभावी ठरू शकतं.
दूधात दालचिनी, हिरवी वेलची, लवंग आणि हळद टाकून हे पेय तयार केलं जातं, जे अँटीबायोटिकसारखं काम करतं.
एका ग्लास दुधात १ दालचिनीचा तुकडा, २ हिरव्या वेलदोड्या, १ लवंग आणि १/४ चमचा हळद घालून उकळा. हवे असल्यास १ चमचा तूपही घालू शकता.
हे पेय रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास चांगली झोप लागते, शरीरातील वेदना कमी होतात आणि त्वचेवर चमक येते.
हा उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. तुम्ही कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.