Aarti Badade
आवळा हा व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला आहे. तो रक्तातील साखर आणि रक्तदाब दोन्ही नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
दालचिनी इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते आणि काळी मिरी पोषक घटकांचे शोषण वाढवते. हे दोन्ही मिळून साखर आणि दाब नियंत्रित ठेवतात.
मेथीमध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते. रिकाम्या पोटी भिजवलेली मेथी घेतल्यास साखरेचे शोषण कमी होते आणि रक्तातील साखर संतुलित राहते.
हळद ही एक उत्कृष्ट दाहशामक आहे. लिंबाच्या रसासह ती पचन सुधारते आणि यकृताला डिटॉक्स करते, रक्तदाबही संतुलित राहतो.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध, जवस रक्तातील साखर आणि दाब नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
भिजवलेले बदाम हे मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात. ते शरीरातील इन्सुलिन कार्यप्रणाली सुधारतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
हे पदार्थ सकाळी उपाशी पोटी घेतल्यास नैसर्गिकरित्या मधुमेह व रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते.