Aarti Badade
अन्नाचे योग्य पचन होणे आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. जेवणानंतर योग्य पदार्थ खाल्ल्यास गॅस, अॅसिडिटी आणि अपचन टाळता येते.
आलेमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जेवणानंतर आले खाल्ल्यास गॅस व अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
एक चमचा बडीशेप जेवणानंतर चावून खाल्ल्याने पचन सुधारते आणि पोट हलके वाटते.
ताकात मीठ आणि जिरे मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते व आतड्यांचे आरोग्य टिकते.
पुदिना व तुळस गॅस व पोटफुगी कमी करतात. त्यांची पाने चावल्याने तोंडाची दुर्गंधीही दूर होते.
एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्याने अन्न सहज पचते.
आवळा मुरब्बा किंवा रस जेवणानंतर घेतल्यास पचनसंस्था बळकट होते आणि अन्न लगेच पचते.
नियमितपणे या पदार्थांचे सेवन केल्यास पचन सुधारते, आणि अॅसिडिटी, गॅससारख्या समस्या दूर राहतात.