Aarti Badade
कोमट लिंबूपाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोट हलके वाटते.
आल्याचा चहा पिल्याने पोटफुगी, मळमळ यासारख्या समस्या दूर होतात. यामुळे शरीरात पित्त रसाचा प्रवाह सुधारतो आणि पचनक्रिया सुलभ होते.
ताकामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात, जे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतात. हे बद्धकोष्ठता आणि अपचन टाळण्यासाठी प्रभावी आहे.
बडीशेप बियांचे पाणी पिल्याने गॅस, पोटफुगी आणि अपचन यांसारख्या तक्रारी कमी होतात. हे पचनासाठी अतिशय फायदेशीर आहे.
पुदिन्याची चहा पोटात थंडावा देते आणि पचनसंस्थेच्या स्नायूंना आराम मिळतो. हे गॅस आणि मळमळ यावरही उपयोगी आहे.
कोरफडीचा रस पचनसंस्थेतील जळजळ कमी करतो आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवतो. सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास जास्त फायदा होतो.
अॅपल सायडर व्हिनेगर पिल्याने पोटातील आम्लपातळी संतुलित राहते आणि पचन सुधारते. हे पाण्यात मिसळून घेतल्यास परिणामकारक ठरते.