सकाळ डिजिटल टीम
आरश्यासमोर केस विंचरताना पांढरे केस दिसतात का? आत्मविश्वास कमी होतो? आजपासून हाळिवच्या बिया खा आणि केसांची वाढ होईल.
अळीवाच्या बियांमध्ये पोषक तत्व असतात ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केस मजबूत होतात आणि कोंडा कमी होतो.
अळीवमध्ये व्हिटामिन E असते, जे शरीरात कोलोजन वाढवते. यामुळे केस पांढरे होणे थांबते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
अळीवच्या बियांमध्ये कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन A आणि C असल्याने केसांची वाढ होते आणि केस काळे होण्यास मदत होते.
अळीव लाडू बनवणे सोपे आहे. बिया पाण्यात भिजवून तव्यात रवा, हाळिम, गूळ, नारळ आणि ड्रायफ्रुट्स घालून लाडू बनवा.
अळीव लाडू रोज एक ग्लास दुधाबरोबर खा. जास्त प्रमाणात सेवन करू नका, पण नियमितपणे खाल्ल्याने केसांची वाढ होईल.
अळीवाच्या बियांमध्ये शरीरासाठी महत्त्वाची पोषक तत्वे असतात. योग्य आहारामुळे केस गळती थांबवता येते.