सकाळ डिजिटल टीम
वजन आणि शुगर वाढू नये म्हणून गोड पदार्थ टाळले जातात,
पण काही पदार्थ हे आपल्याला वाटत नसेल तरी शुगर वाढवू शकतात.
टोमॅटो, चिंच, कवठ अशा चटण्यांमध्ये गूळ असतो. यामुळे तुम्ही गोड पदार्थ खाणं टाळत असतानाही शुगर वाढू शकते.
लोणचं जेवणाची मजा वाढवते. पण बाजारातील लोणच्यामध्ये जास्त तेल, मीठ, आणि प्रिझर्व्हेटीव्ह असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.
हेल्दी म्हणून विकले जात असले तरी, या ड्रिंक्समध्ये जास्त कॅलोरी असतात, जे वजन आणि शुगरला वाढवतात.
दही आणि ताक आरोग्यासाठी चांगले असले तरी, जास्त साखर किंवा मीठ घालण्यामुळे ते वजन आणि शुगर वाढवू शकतात.
पुरी आणि पराठे नेहमीच खातो, पण यामध्ये खूप जास्त तेल किंवा तूप पोटात जात आहे का? यावर विचार करा, अन्यथा शुगर आणि वजन वाढू शकते.