Aarti Badade
मायग्रेनची वेदना सुरु झाल्यावर थोडं पेपरमिंट तेल कपाळावर लावा. हे डोके थंड करून आराम देतं.
आल्यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म मायग्रेन आणि मळमळीपासून आराम देतात.
झोपेची कमतरता मायग्रेन वाढवू शकते, म्हणून पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे.
ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा वापर करा, यामुळे मायग्रेन होण्याची शक्यता कमी होते.
दालचिनी बारीक करून त्याची पेस्ट डोक्यावर किमान अर्धा तास लावा. त्यामुळे मायग्रेन वेदनांमध्ये आराम मिळतो.
निरोगी आहार घ्या, भरपूर पाणी प्या, तेजस्वी प्रकाश आणि मोठा आवाज टाळा.
मायग्रेनची वेदना सतत जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.