Aarti Badade
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, पुरुषांनी दररोज 9 चमचे (36 ग्रॅम) आणि महिलांनी 6 चमचे (25 ग्रॅम) पेक्षा जास्त साखर खाऊ नये.
जास्त साखर खाल्ल्याने शरीर पुन्हा पुन्हा गोड खाण्याची इच्छा निर्माण करतं – ही लक्षणे साखर-निर्भरतेची सुरुवात असते.
रक्तातील साखरेतील बदलांमुळे मूड खराब होतो, चिडचिड वाढते आणि थकवा येतो.
साखर पचनातील चांगल्या बॅक्टेरियांना मारते, त्यामुळे पोट फुगणे, गॅस आणि अपचन सुरू होते.
हार्मोनल असंतुलनामुळे मुरुमं होत असतील, तर साखर खाल्ल्याने हे लक्षणं वाढू शकतात.
साखरेमुळे मेलाटोनिन आणि कोर्टिसोल या झोपेच्या हार्मोन्समध्ये गोंधळ होतो, त्यामुळे झोप कमी आणि खंडित होते.
PMS दरम्यान जास्त साखर घेतल्यास मूड स्विंग्स आणि थकवा वाढतो – साखर टाळल्यास लक्षणं कमी होतात.
जास्त साखर ही पोटाभोवती चरबी वाढवते. त्यामुळे वजन वाढते आणि इतर आरोग्यधोके निर्माण होतात.