सकाळ डिजिटल टीम
दही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, आणि व्हिटॅमिन B6 आणि B12 यांसारखे उपयुक्त घटक असतात.
काही लोक दह्यात साखर टाकतात कारण साखरेमुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि शरीराला ताजगी मिळते.
दह्यात मीठ टाकल्याने कफ आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो.
दह्यात साखर टाकल्याने पचनाची प्रक्रिया सुधरते आणि शरीराला झटपट ऊर्जा मिळते, जे आरोग्यासाठी चांगलं ठरते.
दह्या ऐवजी तुम्ही उन्हाळ्यात ताक, लस्सी,सोलकढी पिणेही फायदेशीर असते. यामुळे पचन तंत्र योग्य राखलं जातं आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
आहारात साखर आणि मीठ यांचं प्रमाण संतुलित ठेवलं तरच ते आरोग्यासाठी योग्य ठरू शकतं. अत्यधिक साखर आणि मीठ हानिकारक असू शकतात.
दह्यात साखर किंवा मीठ टाकणं हे शरीराच्या गरजेनुसार ठरवायला हवं. योग्य प्रमाणात दोन्ही पदार्थ वापरून तुम्ही दह्याचा पूर्ण लाभ घेऊ शकता.