Anuradha Vipat
आता सुहाना खानच्या बॉयफ्रेंडच्या नावाची चर्चा आहे.
सुहाना खान हिचं नाव सध्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत जोडलं जात आहे.
सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.
आता सुहाना खानचा रुमर्ड बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा याच्यासोबतचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
सुहानाने रुमर्ड अगस्त्य नंदासोबत फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सुहाना खानने सोशल मीडियावर अगस्त्य नंदासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती त्याचे कान ओढताना दिसत आहे.
हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना सुहानाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा" आणि एक मजेदार इमोजी देखील पोस्ट केला आहे.