Anuradha Vipat
सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला ख्रिसमसनिमित्त भावनिक पत्र लिहिले आहे.
या पत्राद्वारे त्याने आपले प्रेम व्यक्त केले आहे.
तुरुंगातून लिहिलेल्या या पत्रात सुकेशने जॅकलिनला द्राक्ष बाग थेट भेट म्हणून दिली आहे
जॅकलिन फर्नांडिसला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखर यांनी लिहिले आहे, “माझ्यासाठी तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ख्रिसमस भेट आहेस.
पुढे सुकेशने या पत्रात लिहिले आहे की, “एकमेकांपासून दूर राहिल्यानंतरही मला तुझा सांताक्लॉज बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माझ्या प्रिये, तुझ्यासाठी ख्रिसमस खूप खास आहे.
त्याने पुढे लिहिले की, “आज मी तुला वाईनच्या बाटलीने आश्चर्यचकित करणार नाही, तर मी तुला फ्रान्समध्ये एक संपूर्ण द्राक्ष बाग भेट देत आहे
त्याने पुढे लिहिले, “बेबी गर्ल, तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ख्रिसमस भेट आहेस