Aarti Badade
हा झणझणीत ठेचा बनवण्यासाठी सर्वात आधी सुके बोंबील घेऊन ते वाहत्या पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावेत.
Sukha Bombil Thecha Recipe
Sakal
बोंबील धुतल्यानंतर तीक्ष्ण सुरीच्या साहाय्याने त्यांचे डोके आणि शेपूट कापून पूर्णपणे वेगळे करून टाकावे.
Sukha Bombil Thecha Recipe
Sakal
गॅसवर लोखंडी तवा चांगला गरम करण्यासाठी ठेवावा आणि तवा गरम झाल्यावर त्यावर साफ केलेले सुके बोंबील टाकून वरून थोडे तेल सोडावे.
Sukha Bombil Thecha Recipe
sakal
तेल टाकल्यानंतर सुके बोंबील मंद आचेवर तव्यावर छान तांबूस आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत खरपूस भाजून घ्यावेत.
Sukha Bombil Thecha Recipe
Sakal
त्याच तव्यावर आवडीनुसार भरपूर लसूण पाकळ्या आणि तिखट हिरव्या मिरच्या टाकून डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्याव्यात.
Sukha Bombil Thecha Recipe
Sakal
भाजलेले बोंबील, मिरची आणि लसणासोबत थोडे जिरे, चवीनुसार मीठ, हळद आणि हलका घरगुती मसाला एकत्र करावा.
Sukha Bombil Thecha Recipe
Sakal
सर्व साहित्य एकत्र करून खलबत्त्यात, पाटा-वरवंट्यावर किंवा मिक्सरमध्ये अगदी पल्स मोडवर ठेचा जाडसर वाटून (कुटून) घ्यावा.
Sukha Bombil Thecha Recipe
Sakal
तयार झालेला हा खमंग आणि झणझणीत सुक्या बोंबीलचा ठेचा ज्वारी किंवा बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.
Sukha Bombil Thecha Recipe
Sakal
Clean Surmai Fish Perfectly at Home
Sakal