सकाळ डिजिटल टीम
मार्च महिना सुरू होताच तापमान झपाट्याने वाढत आहे. यंदा विक्रमी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे.
मळमळ, उलटी, थकवा, डिहायड्रेशन, चक्कर येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे.
सौम्य रंगाचे आणि सैलसर कपडे वापरा. घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, कूलर, एसीचा वापर करा.
प्रत्येक तासाला एक ग्लास पाणी प्या. प्रवास करताना पाणी जवळ ठेवा. लिंबू पाणी, ताक, उसाचा रस घ्या.
गॉगल, टोपी, छत्री, बूट किंवा चप्पल वापरा. सकाळी व संध्याकाळीच कामे करा.
दुपारी १२ ते ३ उन्हात फिरू नका. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. वाहनात मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
ओआरएस, लिंबू पाणी, लस्सी घ्या. अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्या!