सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात हळूहळू तापमान वाढतंय. त्यामुळे त्वचेसाठी योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी आवश्यक टिप्स अवलंबवा.
उन्हाळ्यात जास्त हेवी मेकअप करू नका. हलक्या कॉस्मेटिक उत्पादने वापरा, खास करून हेवी फाउंडेशन आणि क्रीम्सऐवजी हलके आणि वॉटर-बेस्ड प्रोडक्ट्स वापरून त्वचा निरोगी ठेवा.
उष्ण तापमानामुळे त्वचेवर अतिरिक्त तेल येतं. चेहऱ्यावर चिकटपणा जाणवतो. त्यामुळे तेल मुक्त उत्पादने वापरा, आणि तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य उत्पादने निवडा.
आपल्या त्वचेची काळजी घेत रहा. उन्हाळ्यात हायड्रेशन, हलकी मेकअप, आणि टोनरचा वापर तुमचं सौंदर्य आणि आरोग्य जपण्यास मदत करतो.
उन्हाळ्यात जेल बेस्ड क्लिन्जर, सीरम, आणि वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरून त्वचा हायड्रेटेड ठेवा. यामुळे चेहऱ्यावर चिकटपणा नाहीसा होईल आणि त्वचा ताजीतवाजा राहील.
उन्हाळ्यात टोनर वापरणं महत्त्वाचं आहे. टोनर त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करतो आणि त्वचेवर ताजेपणा आणतो. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य टोनर वापरा.
उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवणं आवश्यक आहे. त्वचेची चमक आणि आरोग्य टिकवण्यासाठी भरपूर पाणी प्या. द्रव पदार्थ आणि पाणी सेवन करा.