सकाळ डिजिटल टीम
चॅम्पियन्स ट्रॉफी चा फायनल मॅच भारत आणी न्यूझीलंड यांच्यात दुबईत आज होत आहे.
या स्पर्धेत ८ सर्वोत्तम संघ सहभागी होते , त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
विजेत्या संघाला ट्रॉफीसह खास पांढरा ब्लेझर देण्यात येतो, जो सन्मान आणि परंपरेचं प्रतीक आहे.
२००९ पासून ही परंपरा सुरू झाली असून, प्रत्येक विजयी संघातील खेळाडूंना हा ब्लेझर दिला
जातो.
आयसीसीच्या अधिकृत प्रोमो व्हिडिओमध्ये पांढऱ्या ब्लेझरवर यंदाच्या ट्रॉफीचा लोगो झळकत आहे.
प्रोमोमध्ये वसीम अक्रमने या स्पर्धेचा वारसा आणि विजेत्या संघाच्या ब्लेझर परंपरेबद्दल माहिती दिली.
पांढरा रंग प्रतिष्ठा, विजय आणि क्रिकेटमधील परंपरेचं प्रतीक मानला जातो, त्यामुळेच तो खास आहे
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर टीम इंडियाला किती पैसे मिळणार? उपविजेताही करोडपती होणार