उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी ५ रिफ्रेशिंग ड्रिंक्स

Anushka Tapshalkar

काकडीचं ताक

उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी ताक बेस्ट असून, त्यात काकडी घातल्यास थंड आणि डिटॉक्स करणारे गुण वाढतात आणि कमी कॅलरी व जास्त पाणी असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

जल जीरा

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असलेले जीरा पाणी, जळ जीरामध्ये हळद, जिरे, तिखट आणि मसाले असलेले स्वादिष्ट व फायदेशीर रूप असून, साखरेऐवजी गूळ वापरल्यामुळे ते आरोग्यदायी ठरते.

सोलकढी

कोकणाची पारंपरिक सोलकढीमध्ये कोकम आणि नारळ असून, आलं, कोथिंबीर व मिरचीमुळे स्वाद आणि आरोग्यदायी गुण वाढतात, तसेच कोकममुळे पोट भरण्याची क्षमता वाढते आणि पचन सुधारते.

Solkadhi

| sakal

नारळाचे पाणी व सब्जा

उन्हाळ्यात थंड आणि ऊर्जा देणारं नारळ पाणी, त्यात भिजवलेला सब्जा घालल्यास वजन नियंत्रणास मदत होते आणि शरीराला हायड्रेट ठेवून नैसर्गिक ऊर्जा देते.

कलिंगड - तुळस कुलंट

पाण्याचे प्रमाण जास्त असलेलं कलिंगड शरीर थंड ठेवतं, बेली फॅट कमी करण्यास मदत करतं, तुळस मेटाबॉलिझम वाढवते व वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते, तर स्पार्कलिंग वॉटर वापरल्यास भूक कमी होते, पण साखर व सोडा टाळावा.

नैसर्गिक घटकांचा वापर करा

या सर्व पेयांमध्ये कोकम, काकडी, तुळस, जीरा, गूळ यांसारखे नैसर्गिक घटक असतात, जे शरीर हायड्रेट ठेवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.

साखर व कर्बोहायड्रेट टाळा

पॅकेज्ड जूस आणि कोल्ड ड्रिंक्समध्ये साखर व कर्बोहायड्रेट जास्त असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक व घरच्या घरी बनवलेले ड्रिंक्स सर्वोत्तम आहेत.

Sugar and Carbohydrate Drinks

| sakal

...म्हणूनच उन्हाळ्यात गुलकंद खाणं असतं अत्यंत गरजेचं

Gulkand Health Benefits in Summer

|

sakal

आणखी वाचा