IPL मध्ये विकेट्सचं द्विशतक करणारे तीनच गोलंदाज

Pranali Kodre

KKR beat SRH

आयपीएल २०२६ स्पर्धेत ३ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला ७ विकेट्सने पराभूत केले.

SRH vs KKR

|

Sakal

सुनील नरेनच्या २ विकेट्स

या सामन्यात कोलकाताकडून सुनील नरेनने सलील अरोरा आणि ईशान किशन यांना बाद करत २ विकेट्स घेतल्या.

Sunil Narine

|

Sakal

२०० विकेट्सचा टप्पा

त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये २०० विकेट्सचा टप्पा पार केला आहे. त्याने १९७ आयपीएल सामन्यांत २०१ विकेट्स घेतल्या आहेत.

Sunil Narine

|

Sakal

तिसरा गोलंदाज

सुनील नरेन आयपीएलमध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी, तर एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे.

Sunil Narine

|

Sakal

पाचवा क्रमांक

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये सध्या पाचव्या क्रमांकावर आर अश्विन आहे, त्याने २२१ सामन्यांत १८७ विकेट्स घेतल्या आहेत.

R Ashwin

|

Sakal

चौथा क्रमांक

चौथ्या क्रमांकावर पीयूष चावला असून त्याने १९२ सामन्यांत १९२ विकेट्स घेतल्या आहेत.

Piyush Chawla

|

Sakal

दुसरा क्रमांक

तिसऱ्या क्रमांकावर सुनील नरेन आहे, तर त्याच्या पुढे दुसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार असून त्याने १९९ सामन्यांत २१५ विकेट्स घेतल्या आहेत.

Bhuvneshwar Kumar

|

Sakal

पहिला क्रमांक

अव्वल क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे, ज्याने आयपीएलमध्ये १८३ सामन्यांत सर्वाधिक २२८ विकेट्स घेतल्या आहेत.

(आकडेवारी: ३ मे २०२६ पर्यंत)

Yuzvendra Chahal

|

Sakal

ऋतुराजची CSK साठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-३ मध्ये एन्ट्री! पाहा यादीत आणखी कोण

Ruturaj Gaikwad

|

Sakal

येथे क्लिक करा