Pranali Kodre
आयपीएल २०२६ मध्ये २ मे रोजी चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला चेपॉकमध्ये ८ विकेट्सने पराभूत केले.
CSK vs MI
Sakal
चेन्नईच्या या विजयात कर्णधार ऋतुराज गायकवाडने मोलाचा वाटा उचलताना नाबाद अर्धशतक केले.
Ruturaj Gaikwad
Sakal
ऋतुराजने ४८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.
Ruturaj Gaikwad
Sakal
ऋतुराज या खेळीनंतर आता आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने फाफ डू प्लेसिसला मागे टाकले आहे.
Ruturaj Gaikwad
Sakal
फाफ डू प्लेसिसने चेन्नईसाठी आयपीएलमध्ये ९२ सामने खेळताना २० अर्धशतकांसह २७२१ धावा केल्या आहेत. तो आता या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.
Faf du Plessis
Sakal
आता ऋतुराज तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने ८० सामन्यांत २ शतके आणि २२ अर्धशतकांसह २७४७ धावा केल्या आहेत.
Ruturaj Gaikwad
Sakal
चेन्नईसाठी २००० धावांचा टप्पा ५ जणांनीच ओलांडला आहे. यात रवींद्र जडेजाही असून तो या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने १८६ सामन्यांत २१९८ धावा केल्या आहेत.
Ravindra Jadeja
Sakal
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना असून त्याने चेन्नईसाठी आयपीएलमध्ये १७६ सामन्यांत १ शतक आणि ३३ अर्धशतकांसह ४६८७ धावा केल्या आहेत.
Suresh Raina
Sakal
पहिल्या क्रमांकावर एमएस धोनी असून त्याने चेन्नईसाठी आयपीएलमध्ये २४८ सामन्यांत २२ अर्धशतकांसह ४८६५ धावा केल्या आहेत.
MS Dhoni
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Ruturaj Gaikwad
Sakal