सूरज यादव
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्सचा जन्म १९ सप्टेंबर १९६५ रोजी अमेरिकेत झाला. तिचे वडील भारतीय वंशाचे तर आई स्लोवेनियन वंशाची आहे.
सुनिता विल्यम्सने तिचं प्राथमिक शिक्षण नीडम हायस्कूल मॅसाचुसेट्स इथं केलं. १९८३ मध्ये संयुक्त राज्य नौसेना अकादमीची पदवी मिळवली. १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तिनं मास्टर्स केलं.
सुनिता विल्यम्सने १९८७ मध्ये अमेरिकन नौदलात काम करायला सुरुवात केली. पायलट म्हणून तिने अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला होता.
१९९८ मध्ये सुनिता विल्यम्सला नासाने अंतराळवीर म्हणून निवडलं होतं. तेव्हापासून तिचा अंतरावीर म्हणून प्रवास सुरू झाला.
अंतराळवीर म्हणून निवडल्यानंतर ८ वर्षांनी सुनिता विल्यम्स अंतराळ मोहिमेवर गेली. डिसेंबर २००६ मध्ये तिची अंतराळ मोहिम सुरू झाली होती.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुनिता विल्यम्स गेली होती. यावेळी तिने अनेक प्रयोग केले होते. तेव्हा ती अंतराळात १९५ दिवस होती.
सुनिता विल्यम्स अंतराळात सर्वाधिक दिवस राहणारी महिला आहे. ती अंतराळात सलग ३२१ दिवस राहिलीय आणि अजूनही अंतराळातच आहे.
अंतराळात सर्वाधिक वेळा स्पेसवॉक करणारी महिला असाही विक्रम तिच्या नावावर आहे. सुनिता विल्यम्सने ४० ते ५० मिनिटं स्पेस वॉक केलाय.
सुनिता विल्यम्सने अंतराळात असताना २००७ मध्ये बोस्टन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. तिनं अंतराळ स्थानकात एका ट्रेडमिलवर मॅरेथॉन पूर्ण केली होती.
नासाकडून सुनिता विल्यम्सना किती पगार मिळतो?