सकाळ वृत्तसेवा
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती आणि प्रसिद्ध उद्योजक संजय कपूर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या संपत्तीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
करिश्मा कपूर यांचे माजी पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या जाण्याने उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कपूर यांची नेटवर्थ करिश्मा कपूरपेक्षा १०० पट अधिक होती. ते ‘सोना ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक होते.
Sona Group ही ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स बनवणारी अग्रगण्य कंपनी आहे. भारतासह अनेक देशांमध्ये या कंपनीचा मोठा व्यवसाय आहे.
संजय कपूर यांनी रिअल इस्टेट आणि फॅशन इंडस्ट्रीमध्येही भरपूर गुंतवणूक केली होती. त्यामुळे त्यांची संपत्ती प्रचंड मोठी आहे.
त्यांच्या निधनाआधीच संजय कपूर यांनी वसीयत तयार केली होती. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा मोठा हिस्सा प्रिया सचदेव यांच्या नावावर केला होता.
प्रिया सचदेव या एक प्रसिद्ध मॉडेल आणि बिझनेसवुमन आहेत. संजय कपूर यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर दोघांचा संसार स्थिर झाला होता.
संजय कपूर यांचं पहिलं लग्न डिझायनर नंदिता महतानी यांच्याशी झालं होतं, तर दुसरं बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्याशी. दोन्ही विवाह यशस्वी ठरले नाहीत.
प्रिया सचदेव यांना मिळालेल्या संपत्तीत आलिशान गाड्या, जमीन-जुमला, शेअर्स आणि कौटुंबिक व्यवसायातील हिस्साही आहे.