सकाळ डिजिटल टीम
प्रत्येक पुजेत ज्या सुपारीला मान दिला जातो तिची पुजा केली जाते ती सुपारी नेमकी कशी तयार होते जाणून घ्या.
supari making
sakal
सर्वप्रथम, झाडाला लागलेले पोफळीचे पूर्ण वाढलेले पण कच्चे (हिरवे) फळ (ज्याला सुपारीचा गोला म्हणतात) योग्य वेळी झाडावरून काढले जाते.
supari making
sakal
काढलेल्या फळांमधून उत्कृष्ट प्रतीचे फळे वेगळे केले जातात. त्यानंतर, त्यांच्यावरील जाड, तंतुमय बाहेरील साल (शिरसाळी) काढली जाते. हे काम यंत्रांद्वारे किंवा हाताने केले जाते.
supari making
sakal
सुपारीचे दोन मुख्य प्रकार तयार केले जातात - लाल सुपारी (उकळलेली) आणि पांढरी सुपारी (कच्ची वाळवलेली). प्रक्रिया या टप्प्यावर बदलते.
supari making
sakal
उकळल्यामुळे सुपारीतील टॅनिन घटक बाहेर पडतात, ज्यामुळे सुपारीला गडद लाल किंवा तपकिरी रंग येतो आणि ती अधिक टिकाऊ होते.
supari making
sakal
पांढरी सुपारी तयार करण्यासाठी, कच्च्या फळाचे साल काढून लगेच आतील बी (सुपारी) बाहेर काढले जाते. ती उकळली जात नाही.
supari making
sakal
सुपारी पूर्णपणे कडक होईपर्यंत वाळवली जाते. आर्द्रता 10% पेक्षा कमी झाल्यावर ती साठवण्यासाठी किंवा पुढच्या प्रक्रियेसाठी तयार होते.
supari making
sakal
वाळलेल्या सुपारीचे आकार, रंग आणि कडकपणा यानुसार वर्गीकरण केले जाते. यानंतर तीचे छोटे-छोटे तुकडे (चूर्ण, पातळ चकत्या-लप्पी) केले जातात किंवा तशीच अख्खी (अक्कल) ठेवली जाते.
supari making
sakal
तयार सुपारीवर मग सुगंध, चवीसाठी प्रक्रिया करून ती पॅकिंगसाठी (Packaging) पाठवली जाते, जिथे ती खाण्यासाठी तयार होते.
supari making
sakal
Gulvel Benefits
esakal