Aarti Badade
३० वर्षांनंतर महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात आणि चयापचयाची गती कमी होते. त्यामुळे पोषणतत्वांची गरज वाढते, विशेषतः हाडे, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती यासाठी.
मनुकामध्ये अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि व्हिटॅमिन बी मुबलक असते. हे घटक त्वचा निरोगी ठेवतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यात मदत करतात.
अंजीर फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि इस्ट्रोजेनची पातळी नैसर्गिकरीत्या संतुलित राहते.
खजूर हे नैसर्गिक ऊर्जा देणारे फळ असून त्यात लोह, फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. हे शरीरातील अशक्तपणा दूर करते आणि पचन सुधारते.
बदामांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. हे हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त असून हृदयासाठीही फायदेशीर ठरते.
अक्रोड ओमेगा-३ फॅटी अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ईने समृद्ध आहे. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते, हृदय निरोगी राहते आणि त्वचा उजळते.
या सर्व सुक्या मेव्यांचा समावेश रोजच्या आहारात संतुलित प्रमाणात करा. सकाळी भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्यास शरीराला अधिक पोषण मिळते आणि दीर्घकाळ निरोगी राहता येते.