Aarti Badade
हे ५ ड्रायफ्रुट्स यकृतासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत!
फॅटी लिव्हरची समस्या जगभर झपाट्याने वाढतेय! सुमारे 30% लोकसंख्या या आजाराने त्रस्त आहे.
निरोगी आहाराने यकृताचे आरोग्य टिकवता येते. ड्रायफ्रुट्सचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
बदाम – यकृतातील चरबी कमी करतो! व्हिटॅमिन ई, फायबर आणि हेल्दी फॅट्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात.
अक्रोड – ओमेगा-३ चा खजिना! दाहक-विरोधी गुणधर्म यकृत मजबूत ठेवतात.
पिस्ता – चरबी आणि कोलेस्ट्रॉल कमी करतो! अँटीऑक्सिडंट्समुळे यकृतामध्ये चरबी जमा होण्यास अडथळा येतो.
ब्राझील नट्स – यकृत विषमुक्त करतात. सेलेनियम जळजळ कमी करून यकृत निरोगी ठेवतो.
पेकान – पेशींचे संरक्षण करतो. व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स यकृताच्या पेशींना नुकसान होऊ देत नाहीत.
दररोज या ५ ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करा आणि यकृत निरोगी ठेवा.